निकालपत्रक | result excel file इयत्ता 1 ली ते 7 वी

Sunil Sagare
1

इ १ ली ते ७ वी निकाल सॉफ्टवेअर २०२३-२४




निकाल पत्रक एक्सेल सॉफ्टवेअर २०२४ मध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. व सॉफ्टवेअर  वापरण्यास अधिक सोपे अधिक आकर्षक केले आहे. यात नवीन काही सुविधाही दिलेल्या आहेत. सॉफ्टवेअर मध्ये 

केलेल्या बदलांची सविस्तर माहिती या पोस्ट द्वारे देत आहे.

महत्वाचे बदल 

१. नोंदवही च्या नमुन्यात बदल केला असून एका सत्राच्या वर्णनात्मक नोंदी व गुण दोन ऐवजी एकाच पानावर घेतलेल्या आहेत.
वर्णनात्मक नोंदी करण्यासाठी प्रत्येक सत्रासाठी एक नवीन शीट दिलेली असून त्यात केलेल्या वर्णनात्मक नोंदी विदयार्थी हजेरी क्रमांकानुसार आपोआप नोंदवही मध्ये अपडेट होतात. 
ही निकाल पत्रक फाईल मोबाईल मध्ये घेऊन व्हॉइस टायपिंग द्वारेही वर्णनात्मक नोंदी करू शकता.
२. नोंदी गुण तक्त्याच्या पानावर घेतल्यामुळे आता नोंदी साठी वेगळे पण प्रिंट करण्याची गरज नाही.
३. नवीन फाईल मध्ये जुन्या गुणपत्रका बरोबरच नवीन गुणपत्रक नमुना दिला असून या नवीन नमुन्यात स्टुडंट आय डी, आधार नंबर यांसारखी माहितीही समाविष्ट केली आहे.
४. जातनिहाय व विषयनिहाय / श्रेणीनिहाय निकाल विश्लेषणासाठी वेगळे फॉरमॅट्स स्वतंत्र शीट्स वर देण्यात आलेले आहेत.
५. सॉफ्टवेअर वापराने सोपे जावे म्हणून मुख्य मेनू चे आकर्षक व सुटसुटीत डिझाईन असलेली नवीन शीट या फाईल मध्ये दिलेली आहे.


खालील लिंक वर क्लिक करून हे नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता...

cce result excel sheet  --> डाउनलोड करा

cce result excel sheet --> डाउनलोड करा 




सॉफ्टवेअर कसे वापरावे ?

१. students, InputT1 व InputT2, nondiT1 व nondiT2 या ३ शीट्स मध्येच गुणांची माहिती व विद्यार्थी माहिती भरावी, 
2. students मध्ये विद्यार्थी माहिती भरावी, इयत्ता drop down मधून निवडावी.
3. InputT1 मध्ये सत्र १ चे व inputT2 मध्ये सत्र २ चे गुण व विशेष नोंदी भराव्यात.(नमूना विशेष नोंदी Nondisangrah या शीट मध्ये सर्व विषयांनंतर दिलेल्या आहेत.)   
   NondiT1 व NondiT2 मध्ये दैनंदिन नोंदी कराव्यात, अथवा तुम्ही मोबाइल मध्ये फाइल घेऊन व्हॉईस टायपिंग ही करू शकता.
४. इतर शीट्स मधील माहिती आपोआप तयार होईल.
५. NondwahiT1 व NondwahiT1  मध्ये ज्या विद्यार्थ्याची माहिती प्रिंट करायची आहे त्याचा हजेरी क्रमांक टाकावा व InputT1 व InputT2 मध्ये
तुम्ही निश्चित केलेले पैकी गुण आणि प्राप्त गुण व इतर सर्व माहिती आपोआप तयार होईल.
६. ResultT1 मध्ये सत्र २ चा निकाल व त्याखाली श्रेणीनिहाय, विषयनिहाय निकाल तयार होईल.
       त्याचप्रमाणे ResultT2 मध्ये सत्र २ चा निकाल मिळेल. 
७. Annual या sheet मध्ये वार्षिक निकाल पत्रक तयार होईल.
८. GradeCard व G_Card2 या sheet मध्ये विद्यार्थी प्रगतिपत्रक आहे, त्यात फक्त संबंधित विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक 
  टाकल्यास त्याचे संपूर्ण गुणपत्रक प्रिंट साठी आपोआप तयार होईल.
  (सुरुवातीच्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक तयार करताना महिन्याचे एकूण कामाचे दिवस फक्त टाका,
  इतर विद्यार्थ्यांसाठी तेच दिवस लागू होतील, हजर दिवस आपोआप येतील.)
९. SMF-abstract, GradewiseT1 व T2, CastewiseT1 व T2 या sheet मध्ये विषय व श्रेणीनिहाय मुले व मुली यांची संख्याही सत्रनिहाय आपोआप तयार होईल.
१०. students या शीट मध्ये विद्यार्थी फोटो या शेवटून दुसऱ्या कॉलम मध्ये विद्यार्थी नावासमोरील संबंधित सेल सलेक्ट करून त्यात फोटो insert करावा,
   हा फोटो नंतर सेल मध्ये बसेल अशा प्रकारे छोटा (resize) करून घ्या, अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी फोटो insert करून घ्या.
११. शेवटच्या लाल रंगातील कॉलम मध्ये कोणताही बदल करू नका, तो फोर्मुला कॉलम आहे.
१२. आता तुमच्या GradeCard या शीट मध्ये एका क्लिक वर संबंधित विद्यार्थी माहिती बरोबर विद्यार्थी फोटोही बदलेल.
१३. जेथे गरज नसेल ते कॉलम व रो विद्यार्थी / विषय संख्ये नुसार hide/minimise करा, Delete करू नका.(Delete केल्यास फोर्मुले काम करणार नाहीत.)



  • दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व आठवी वर्गाचा निकाल बनवण्याचे एक्सेल शीट खालील लिंक वर उपलब्ध आहे.
  • ५ वी व ८ वी निकाल सॉफ्टवेअर  
Result Excel Sheet English Medium

निकाल पत्रक एक्सेल सॉफ्टवेअर इंग्रजी माध्यमातील शाळेसाठीही उपलब्ध आहे. खालील लिंक द्वारे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता .

Download English Result Sheet




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top